ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
पेट्रोलियम कंपन्यांनी आज पुन्हा एकदा पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत वाढ केली आहे. त्यानुसार, आज पेट्रोलच्या किंमतीत प्रति लिटर 35 पैशांनी वाढ झाली. डिझेलच्या किंमतीत प्रति लिटर 35 पैशांनी वाढ झाली आहे. महाराष्ट्र, राजस्थान, ओडिशासह अन्य काही राज्यात पेट्रोलने शंभरी ओलांडली आहे.
The price of petrol & diesel in #Delhi is at Rs 98.11 per litre and Rs 88.65 per litre respectively today
— ANI (@ANI) June 26, 2021
Petrol & diesel prices per litre – Rs 104.22 & Rs 96.16 in #Mumbai, Rs 99.19 & 93.23 in #Chennai, Rs 97.97 & Rs Rs 91.50 in #Kolkata pic.twitter.com/Z17sfEGR7T
- मुंबईत पेट्रोल 104.22 रुपये
मुंबईत आज पेट्रोल प्रति लिटर 104.22 रुपये तर डिझेल 96.16 रुपये इतके झाले आहे. पुणे शहरात पेट्रोल 103. 48 रुपये प्रति लिटर तर डिझेल 94.25 रुपये प्रति लिटर इतके आहे.
दिल्लीत पेट्रोल 98.11 रुपये तर डिझेल 88.65 रुपये इतके झाले आहे. चेन्नई पेट्रोल 99.18 रुपये तर डिझेल 93.22 इतके आहे. आणि कोलकातामध्ये पेट्रोल 97.99 रुपये तर डिझेल 91.49 रुपये इतके वाढले आहे.
- ‘या’ शहरांमध्ये पेट्रोल 100 पार
राजस्थान, मध्यप्रदेश, महाराष्ट्र, आंध्र प्रदेश, तेलंगणा, कर्नाटक, ओडिशा, जम्मू काश्मीर आणि लडाखमध्ये पेट्रोलची किंमत 100 रूपयांपेक्षा अधिक आहे. याशिवाय महानगरात मुंबई, हैदराबाद आणि बेंगळूरमध्ये पेट्रोलची किंमत याआधी पासूनच 100 रूपयांपेक्षा अधिक आहे.
- दररोज 6 वाजता किंमती बदलतात
दररोज सकाळी 6 वाजता पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती बदलतात. नवीन दर सकाळी 6 वाजल्यापासून लागू होत असतात. पेट्रोल डिझेलच्या किंमतीत उत्पादन शुल्क, डीलर कमिशन आणि इतर गोष्टी जोडल्यानंतर त्याची किंमत जवळजवळ दुप्पट होते. परदेशी विनिमय दरासह आंतरराष्ट्रीय बाजारात क्रूडचे दर काय आहेत, यावर पेट्रोल आणि डिझेलचे दर दररोज बदलत असतात.