ऑनलाईन टीम / लंडन :
राष्ट्रपिता महात्मा गांधींनी लंडनमधील एका कुटुंबाला भेट दिलेल्या सोन्याच्या कडा असलेल्या चष्म्याच्या जोडीचा ऑनलाईन लिलाव करण्यात येणार आहे. या चष्म्यांचा लिलाव 10-15 हजार पाऊंडपर्यंत म्हणजेच भारतीय चलनानुसार 9.77 ते 14.66 लाख रुपयांपर्यंत होऊ शकतो.
इंग्लंडमधील एका वृद्ध विक्रेत्याकडे गांधींजींचे हे चष्मे होते. या विक्रेत्याच्या काकांना ब्रिटीश पेट्रोलियममध्ये काम करत असताना 1910 ते 1930 दरम्यानच्या काळात गांधीजींनी हे चष्मे भेट दिले होते.
महात्मा गांधीच्या खासगी चष्म्याची जोडी या मथळ्याखाली 21 ऑगस्ट रोजी या चष्म्याच्या जोडीचा लिलाव करण्यात येणार आहे. 6 हजार पाऊंडला या चष्म्याची ऑनलाईन मागणी करण्यात आली आहे. ऍन्डी स्टो कंपनी या चष्म्यांचा लिलाव करत आहे.