ऑनलाईन टीम / मुंबई :
महाराष्ट्रात मागील काही दिवसांपासून कोरोना रुग्णांच्या प्रमाणात घट होताना दिसत आहे. मागील 24 तासात 8 हजार 085 नवीन कोरोनाबाधित आढळले असून 8,623 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर कालच्या दिवशी 231 रूग्णांचा मृत्यू झाला आहे.
राज्यात आजपर्यंत एकूण 58 लाख 09 हजार 548 कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 96 टक्के इतके झाले आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर 2.01 टक्के एवढा आहे.
दरम्यान, आजपर्यंत तपासण्यात आलेल्या 4,13,98, 501 प्रयोगशाळा नमुन्यांपैकी 60 लाख 51 हजार 633 (14.62%) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात 6,21,377 व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर 3,584 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. राज्यात सद्य स्थितीत 1 लाख 17 हजार 098 ॲक्टिव्ह रुग्ण आहेत.