वृत्तसंस्था/ मुंबई
महाराष्ट्रातील सुमारे 150 हॉकीपटूंच्या सराव शिबिराला प्रारंभ झाला असून या शिबिरावेळी कोरोना संदर्भातील सर्व नियमांची अंमलबजावणी करण्यात आल्याची माहिती हॉकी इंडियाच्या प्रवक्त्याने दिली.
गेल्या काही महिन्यांपासून कोरोना समस्येमुळे महाराष्ट्रातील हॉकीपटूंना हॉकीचा सराव करण्याची संधी मिळाली नव्हती. पण आता हॉकी इंडियाच्या प्रयत्नांमुळे राज्यातील हॉकीपटूंनी सरावाला प्रारंभ केला आहे. मैदानावर हॉकीचा सराव करताना सोशल डिस्टन्स तसेच कोरोनासंदर्भातील इतर नियमांची अंमलबजावणी केली जात असल्याचे हॉकी महाराष्ट्राचे सरचिटणीस मनोज भोरे यांनी सांगितले. पुण्याच्या बालेवाडी येथील हॉकी स्टेडियमवर हॉकीपटूंसाठी नवे हॉकी टर्फ घालण्यात आल्याची माहिती भोरे यांनी दिली आहे.