- मागील 24 तासात 3,717 नवे रुग्ण; 70 मृत्यू
ऑनलाईन टीम / मुंबई :
महाराष्ट्रात मागील 24 तासात 3,717 नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले. तर 70 जणांचा मृत्यू झाला. त्यामुळे राज्यातील एकूण कोरोना बाधितांची संख्या 18 लाख 80 हजार 416 वर पोहचली आहे. तर मृतांचा एकूण आकडा 48 हजार 209 एवढा आहे.
कालच्या एका दिवसात 3,083 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. तर राज्यात आतापर्यंत 17 लाख 57 हजार 005 रुग्ण कोरोनामुक्त झाले असून, त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. सद्य स्थितीत राज्यात 74 हजार 104 रुग्ण उपचार घेत आहेत. राज्यातील कोरोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण सध्या 93.44 % आहे. मृत्यू दर 2.56 % आहे.
प्रयोगशाळेत आतापर्यंत तपासणीसाठी पाठविण्यात आलेल्या 1 कोटी 17 लाख 02 हजार 457 नमुन्यांपैकी 18 लाख 80 हजार 416 रुग्णांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात लोक होम 5 लाख 12 हजार 587 क्वारंटाईनमध्ये असून, 4 हजार 403 लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.