पुणे / प्रतिनिधी
पुढील काही दिवस महाराष्ट्रातील काही भागात तुरळक पावसाचा अंदाज पुणे वेधशाळेने वर्तविला आहे. दरम्यान, ढगाळ वातावरणामुळे राज्यातील थंडीचा कडाका कमी झाला असून, सोमवारी नागपुरात 14.6 अंश सेल्सिअस इतके किमान तापमान नोंदविण्यात आले.
वातावरणातील बदलामुळे उत्तरेकडच्या अनेक भागात पावसाचा मारा सुरू आहे. परिणामी राज्यातही पावसाचे आगमन झाले असून, कोकण-गोवा मध्य महाराष्ट्रातील काही भागात तुरळक पावसाने हजेरी लावली. दरम्यान, पुढील दोन दिवस या भागात अशीच स्थिती कायम राहणार आहे. 7 व 8 जानेवारीला राज्यात सर्वत्र तुरळक पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे.