ऑनलाईन टीम / मुंबई :
महाराष्ट्रात मागील 24 तासात 22,084 नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले. तर 391 रुग्णांचा मृत्यू झाला. त्यामुळे राज्यातील एकूण कोरोना बाधितांची संख्या 10 लाख 37 हजार 765 वर पोहचली आहे. तर मृतांची संख्या 29 हजार 115 एवढी आहे.
शनिवारी दिवसभरात 13 हजार 489 रुग्ण कोरोनामुक्त झाले. राज्यात आतापर्यंत 7 लाख 28 हजार 512 रुग्ण कोरोनामुक्त झाले असून, त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. सध्या 2 लाख 79 हजार 767 रुग्ण उपचार घेत आहेत. राज्यातील कोरोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण सध्या 70.02 % आहे. तर मृत्यू दर 2.81 % आहे.
प्रयोगशाळेत आतापर्यंत तपासणीसाठी पाठविण्यात आलेल्या 51 लाख 64 हजार 840 नमुन्यांपैकी 10 लाख 37 हजार 765 रुग्णांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात 16 लाख 52 हजार 955 लोक होम क्वारंटाईनमध्ये असून, 38 हजार 275 लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.