ऑनलाईन टीम / मुंबई :
महाराष्ट्र राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव नियंत्रणात असला तरी कोविड 19 रुग्णांचा आकडा पुन्हा वाढ आहेत. तसेच ब्रिटनमध्ये कोरोनाचा नवा स्ट्रेन सापडल्याने खबरदारी घेण्यात येत आहे. सध्या राज्य सरकारने बंद असलेल्या शाळा सुरु करण्यास परवानगी दिली आहे. त्याचवेळी कोरोनाचा धोका नको म्हणून पुन्हा एकदा लॉकडाऊन वाढविण्याचा निर्णय ठाकरे सरकारने घेतला आहे.
आता हेे लॉकडाऊन 28 फेब्रुवारीपर्यंत असणार आहे. असे असले तरी आतापर्यंत परवानगी देण्यात आलेल्या सेवा आणि गोष्टी सुरू राहणार आहेत.
- या सूचनांचे पालन आवश्यक
- सार्वजनिक ठिकाणी मास्क बंधनकारक
- सोशल डिस्टन्सिंग पाळणे आवश्यक
- साबणाने सतत हात धुणे आवश्यक