- ठाकरे सरकारकडून ‘अनलॉक’ची नवी नियमावली जाहीर
ऑनलाईन टीम / मुंबई :
महाराष्ट्र सरकारने ‘अनलॉक’ संदर्भातील नवीन नियमावली जारी करण्यात आली आहे. नव्या नियमावलीनुसार, उद्यापासून नाट्यगृह, सिनेमागृह आणि मल्टिप्लेक्स 50% क्षमतेने सुरू करण्यास राज्य सरकारने परवानगी दिली आहे. यासंबंधीची एसओपी लवकरच जारी केली जाणार आहे.
असे असले तरी मल्टिप्लेक्स, नाट्यगृग, सिनेमागृहात खाण्याचे पदार्थ घेऊन जाण्यास परवानगी नाकारण्यात आली आहे. तसेच कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी घालून देण्यात आलेल्या नियमांचे पालन करणे बंधनकारक असणार आहे.
यासोबतच राज्य आणि आंतरराष्ट्रीय दर्जाच्या खेळांडूना सरावासाठी कंटेनमेंट झोनबाहेर स्विमिंग पूल उद्यापासून सुरु करण्याची मुभा देण्यात आली आहे. तसेच कन्टोनमेंट झोनबाहेर योगा इन्स्टिट्युटही सुरु करण्यास परवानगी देण्यात आली आहे.
टेनिस, बडमिंटन, टेबल टेनिस, शूटिंगसारखे इनडोअर गेम साठीही परवानगी देण्यात आली आहे. मात्र यावेळी सोशल डिस्टन्सिंगचे नियम पाळणे बंधनकारक असणार आहे. यासंबंधीच्या एसओपीही लवकरच जारी करण्यात येणार आहे.