वार्ताहर / म्हैसाळ
म्हैसाळ येथील आबासाहेब शिंदे सोसायटीच्या चेअरमन श्रीमती पद्मिनीदेवी मोहनराव शिंदे म्हैसाळकर यांची महाराष्ट्र स्टेट कंझ्युमर्स फेडरेशन लि मुंबई शाखा कोल्हापूरच्या अध्यक्षपदी निवड झाली आहे.
श्रीमती शिंदे यांनी आबासाहेब शिंदे सोसायटीच्या चेअरमन म्हणून गेली १०-१५ वर्षापासून उत्कष्ट कामगिरी बजावत आहेत. तसेच श्री गणपती जिल्हा कृषी औद्योगिक खरेदी विक्री संघ सांगलीच्या उपाध्यक्ष म्हणून अनेक वर्षे काम केले आहे. महिलांच्या सक्षमीकरणासाठी व स्वावलंबनासाठी माजी आमदार मोहनराव शिंदे यांच्या प्रेरणेने लक्ष्मी महिला मंडळाची व कुमुदिनी महिला पत संस्थेची स्थापना केली.या शिवाय त्या नी ” बकुळगंद” नावाचे आत्मचरित्र लिहिले आहे.
याशिवाय विविध विषयावर लेखन करण्याचा साहित्यिक छंद नेहमीच जोपासला आहे.अशा प्रकारे त्यांनी सामाजिक , शैक्षणिक व साहित्यिक क्षेत्रात मोलाची कामगिरी बजावली आहे. त्यांच्या या कार्याची दखल घेऊन एक राज्यस्तरीय संस्थेवर निवड झाली आहे. मोहनराव शिंदे सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन मनोज बाबा शिंदे म्हैसाळकर यांच्या त्या मातोश्री आहेत.