प्रतिनिधी / सांगली
पुणे पदवीधर मतदारसंघातून अरुण लाड आणि शिक्षक मतदारसंघातून जयंत आसगावकर यांनी मिळवलेल्या विजयाबद्दल महाविकास आघाडीतील काँग्रेस राष्ट्रवादी आणि शिवसेना यांच्यावतीने सांगलीत काँग्रेस कमिटी राष्ट्रवादी काँग्रेस कार्यालय आणि शहरातील विविध ठिकाणी फटाक्याची आतषबाजी आणि गुलालाची उधळण करून जल्लोष करण्यात आला.
यावेळी काँग्रेस नेते पृथ्वीराज पाटील, जयश्री पाटील, राष्ट्रवादीचे विष्णू माने, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे महेश खराडे यांच्यासह आजी माजी नगरसेवक कार्यकर्ते शिवसैनिक उपस्थित होते.