वृत्तसंस्था/ मुंबई
गेल्या जानेवारीमध्ये महिंद्रा आणि महिंद्रा कंपनीच्या व्यावसायिक वाहनांच्या विक्रीमध्ये 57 टक्के इतकी लक्षणीय वाढ झाली असल्याची बाब समोर आली आहे.
कंपनीने जानेवारी 2022 मध्ये 21 हजार 111 व्यावसायिक वाहनांची विक्री केली आहे. या तुलनेमध्ये जानेवारी 2021 मध्ये 13 हजार 388 वाहनांची विक्री करण्यात आली होती. कंपनीच्या विक्रीमध्ये निर्यातीच्या माध्यमातूनही वाढ झाली आहे. वाहनांची निर्यात 26 टक्के वाढून 1950 इतकी जानेवारीमध्ये नोंदली गेली आहे. कंपनीच्या वाहन उत्पादनातही वाढ करण्यात आली असल्याचे सांगितले जाते.