तालिबानच्या अंतरिम सरकारचा निर्णय, कठोर ड्रेसकोड
काबूल / वृत्तसंस्था
अफगाणिस्तानाच्यग्ना तालिबान अंतरिम सरकारने महिलांना विद्यापीठांमध्ये पुरुषविरहित वर्गांमध्ये शिकण्यास अनुमती दिली आहे. या निर्णयावर चहूकडून टीकाही होत आहे. महिलांना त्यग्नांचे अधिकार नाकारण्यग्नाचाच हा एक मार्ग आहे, असे मत अनेक आंतरराष्ट्रीय तज्ञांनी व्यक्त केले आहे.
शिकण्याची अनुमती मिळाली असली तरी कठोर नियमांचे पालन करावे लागणार असल्यग्नाने किती महिला अशा स्थितीत शिक्षण घेऊ शकतील हा प्रश्नच असल्यग्नाचे बोलले जात आहे. मुलांना आणि मुलींना एकत्र शिक्षण घेण्यग्नात तालिबान कधीही अनुमती देणार नाही. कारण सर्व गैरप्रकारांचे मूळ या सहशिक्षण पद्धतीत आहे, असे मतप्रदर्शन तालिबानच्यग्ना अधिकृत प्रवक्त्याने रविवारी केले.
विषयांचाही आढावा घेणार
विद्याथ्यर्ग्नांना, विशेषतः विद्यार्थिनींना कोणते विषय शाळा आणि विद्यापीठांमधून शिकविले जातात, यावर तालिबान सरकारचे लक्ष असणार आहे. मात्र याविषयी सविस्तर माहिती देण्यात आली नाही. तालिबानच्या मागच्या सरकारने देशात सर्वत्र संगीत आणि कला यग्नांच्या शिक्षणावर बंदी घातली होती. आताही तेच पेले जाईलक् अशी शक्यता व्यक्त होत आहे. विद्यग्नार्थिनींच्या वेषभूषेसंबंधीही कठोर नियम लागू करण्यात येणार आहेत. काही महिला संघटनांनी याचा निषेध केला आहे.
आशांवर पाणी फेरले
तालिबान दहशतवादाचा मार्ग सोडणार आहे, अशी आशा अनेकांनी बाळगली होती. तथापि, या संघटनेच्या अंतरिम मंत्रीमंडळातील नावे पाहता या आशेवर पाणी फेरले गेले आहे, अशी टिप्पणी अनेक अमेरिकन अभ्यासकांनी केली आहे. तालिबानच्या मंत्रिमंडळात कट्टर धार्मिक नेत्यग्नांचा समावेश आहे. त्यामुळे नजीकच्या भविष्यकाळात ही संघटना जुन्याच वळणावर गेलेली दिसेल. आधुनिक मानवाधिकार संकल्पनांना आता या देशात कोणतीही किंमत मिळणार नसून हा देश मध्ययुगिन अत्याचारांच्या कालखंडात जाईल, अशी चिंताही व्यक्त होत आहे.