प्रतिनिधी /बेळगाव
महाराष्ट्र एकीकरण महिला आघाडीच्यावतीने सोमवारी हुतात्मा चौक येथे हुतात्म्यांना अभिवादन करण्यात आले. महिला आघाडीच्या अध्यक्षा व माजी उपमहापौर रेणू किल्लेकर यांनी अभिवादन केले.
सीमाप्रश्नासाठी महिलांनीही रक्त सांडले असून यापुढेही महिला सीमाप्रश्नासाठी रस्त्यावर उतरतील, असे रेणू किल्लेकर यांनी यावेळी सांगितले. यावेळी प्रिया कुडची, प्रभावती सांबरेकर यांच्यासह महिलांनी हुतात्म्यांना अभिवादन केले.