प्रतिनिधी /बेळगाव
महिला विद्यालय मंडळ, इंग्रजी माध्यम शाळेच्यावतीने शाळेच्या आवारात वृक्षारोपण करण्यात आले. टीजेएसबी बँकेच्या काळी आमराई शाखेच्यावतीने रोपे देण्यात आली होती. विविध प्रकारच्या रोपांची यावेळी लागवड करण्यात आली.
शहरातील वृक्षांच्या संख्येत वाढ होवून पर्यावरणाचे संरक्षण व्हावे, या दृष्टीने हा उपक्रम राबविण्यात आला. टीजेएसबी बँकेच्या कर्मचाऱयांनीही यामध्ये सहभाग घेतला. मुख्याध्यापिका कविता पूरमाणिक यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम पार पडला. यावेळी बॅंकेचे कर्मचारी व शाळेचे शिक्षक उपस्थित होते.