मगो पक्षाचे उमेदवार श्रीधर मांजरेकर यांना पाठिंबा
पेडणे / ( प्रतिनिधी )
मोरजी जिल्हा पंचायत निवडणुकीतील काँग्रेस उमेदवार महेश कोनाडकर यांनी निवडणुकीतून माघार घेऊन मगो पक्षाचे उमेदवार श्रीधर मांजरेकर यांना आपला पाठिंबा जाहीर करत असल्याची माहिती पत्रकार परिषदेत माहिती .
मांदे येथे जीत आरोलकर यांच्या कार्यलयात आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत मगोचे मांदे मतदारसंघाचे नेते जीत आरोलकर ,मगोचे मोरची जिल्हा पंचायत उमेदवार श्रीधर मांजरेकर , सरपंच आम्रोज फर्ना?डिस आदी उपस्थित होते .
मोरजी मतदार संघाचे काँग्रेस उमेदवार महेश कोनाडकर यांनी बोलताना काँग्रेस पक्षाने आजपर्यंत कोणत्याच प्रकारचा निधी उपलब्ध करून दिला नाही .लोकांसमोर कोणता कार्यक्रम घेऊन आपण जाणार होतो ,काँग्रेसकडे काहीही विव्हज नसल्याने आपण वैतागलो .
भाजप उमेदवाराचा पराभव करण्यासाठी पाठिंबा : महेश कोनाडकर
महेश कोंनाडकर यांनी बोलताना भाजपचा उमेदवार विजयी होऊ नये तसेच मतांचे विभाजन होऊ नये म्हणून आपण मगोचे श्रीधर माजरेकर यांना आपला पाठिंबा दिल्याचे जाहीर केले.
पेडणे तालुक्मयातील मगो पक्षाचे तिन्ही उमेदवार विजयी होणार : आरोलकर
मगोचे नेते जीत आरोलकर यानी बोलताना जिल्हा पंचायतीच्या निवडणुकीत मोरजीतून श्रीधर मांजरेकर , धारगळ मधून आत्माराम धारगळकर व तोरसे मधून प्रियांका महाले हे तिन्ही उमेदवार विजयी होणार असा विश्वास व्यक्त करून हरमल मतदार संघातून मगोने आपली उमेदवारी यापूर्वीच मागे घेतलेली आहे . या मतदार संघात कुणाला पाठिंबा द्यायचे हे दोन दिवसात मगोचे नेते आमदार सुदिन ढवळीकर जाहीर करणार असल्याचे सांगून , मोरजी मतदार संघातून काँग्रेसचे उमेदवार महेश कोनाडकर यांनी आपला पाठिंबा मगोला देऊन मगोच्या उमेदवाराची ताकत वाढवण्यासाठी मदत केल्याबद्दल आपण त्यांचे आभार मानतो असे सांगितले.
जिल्हा पंचायतीच्या निवडणूकीत शंभर टक्के मगोला यश मिळवून देणार आहे. सरकारने ही निवडणूक जाहीर करताना विरोधकांना विश्वासात घेतले नाही. ज्या दिवशी आचारसंहिता लागू झाली त्याच वेळी भाजपाच्या सभा चालू होत्या. असे सांगून सरकारच्या विरोधात ही निवडणूक निर्णयक ठरणार आहे.