मांद्रे वार्ताहर
मांदे जुनासवाडा रेव्हा रिसॉर्ट मध्ये 7 व 8 रोजी संगीत रजनीसाठी पेडणेचे उपजिल्हाधिकारी चंद्रकांत शेटकर यांच्या सहिनुसार रात्रौ दहा पर्यंत 55 डेसीबल क्षमतेच्या आवाजाने परवानगी दिली होती ,मात्र मोठय़ा आवाजाने संगीत चालू आहे ध्वनिप्रदूषण मोठय़ाप्रमाणात चालू होते .
मांद्रे सरपंच सेरोफिना फेर्ना?डिस यांच्या नैतृत्वखाली पंच सुभाष आसोलकर पंच व नागरिक यांनी त्या विरोधात निदर्शने केली .
उपजिल्हाधिकारी चंद्रकांत शेटकर यांच्या विरोधात मानवधिकारवलोकायुक्तांकडे तक्रार करून पेडणे पोलीस निरीक्षक संदेश चोडणकर यांनाही पार्टी करून त्यांच्याविरोधात तक्रार केली जाईल अशी माहिती संदेश सावंत वकील प्रसाद शहापुरकर यांनी दिली .
सरपंच सेरोफिना फेर्ना?डिस यांनी गेटच्या बाहेर राहून परवानगी प्रत मागितली मात्र आयोजकांनी त्यांनाही काहीही प्रतिसाद दिला नाही ,त्यामुळे खुद्द सरपंच यांचाही अवमान झाला .
आज रास्ता रोको करणार
दोन दिवस चाललेल्या ध्वनिप्रदूषण विरोधात सरकारी यंत्रणा काहीच कारवाई करत नाही त्याच्या निषेधार्थ आज 8 रोजी सायंकाळी 7 वाजता मांदे येथे रास्ता रोको करण्यात येईल असा इशारा दिला ,शिवाय विध्यार्थ्यांना घेऊन शांततेने मोर्चा काढण्यात येईल अशी माहिती प्रसाद शहापुरकर यांनी दिली .
एक विदेशी महिला या निदेशीर्षनात सहभागी झाली होती त्याने प्रतिक्रिया देताना हा आवाज हॉरेबल असून , येथली शांतता भंग पोचत आहे .
शेली फेर्ना?डिस यांनी बोलताना हा आवाज दुपारी सुरू हॉते ते पहाटे पर्यंत चालते आम्ही अश्यावेली काय करावे असा सवाल उपस्थित करून आम्हाला ध्वनिप्रदूषण नको आम्हाला शांतता हवी सरकारने योग्य ती कारवाई करावी अशी मागणी केली .
संदेश सावंत यांनी बोलताना 17 नियम घालून रेव्हा रिसॉर्ट साठी परवानगी दिलीवत्या 16 नियमाचे पालन आयोजकाने केले नाही त्यामुळे त्याचा परवाना रद्द करायला हवा होता ,आता सरकारच्या विरोधात लोकाधिकार आयुक्त्याकडे तक्रार केली जाईल अशी माहिती दिली.
वकील प्रसाद शहापुरकर यांनी बोलताना आश्वे मांदे मोरजी किनारा हा कासव संवर्धन मोहिमेसाठी संवेदनशील म्हणून जाहीर केल्याने या भागात सायंकाळी 7वास विजेचे दिवे व संगीत वाजवण्यास निर्बध आहे ,या ठिकाणी उपजिल्हाधिकारी परवानगी देऊ शकत नाही मात्र सर्रास हा प्रकार चालू आहे ,आता या पुढे हा प्रकार खपवून घेतला जाणार नाही असा इशारा दिला .
10 वाजता संगीत रजनी बंद
रेव्हा रिसॉर्टने संगीत रजनी 10 वाजता बंद केली .