ऑनलाईन टीम / मुंबई :
महाराष्ट्रात गेल्या 24 तासात 154 पोलिसांना कोरोनाची लागण झाली तर 2 जणांनी आपला जीव गमावला आहे. तर आतापर्यंत 24 हजार 735 पोलिसांना कोरोनाची बाधा झाली आहे. तर आतापर्यंत 259 पोलिसांनी आपला जीव गमावला आहे. त्यामुळे पोलिसांमध्ये सध्या भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, आतापर्यंत आढळलेल्या 24,735 कोरोनाबाधित पोलिसांमध्ये 2703 पोलीस अधिकारी आणि 22,032 कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. तर आतापर्यंत 22 हजार 082 पोलीस कर्मचाऱ्यांनी कोरोनावर यशस्वीरित्या मात केली असून त्यांना घरी सोडण्यात आले आहे. यामध्ये 2401 पोलीस अधिकारी आणि 19,681 पोलीस कर्मचाऱ्यांचा समावेश आहे.
सद्यस्थितीत राज्यात 2394 कोरोनाबाधित पोलीस कर्मचाऱ्यांवर विविध रुग्णालयात उपचार सुरु आहेत. यामध्ये 277 पोलीस अधिकारी आणि 2117 पोलीस कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. तर आतापर्यंत कोरोनामुळे 259 जणांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये 25 पोलीस ऑफिसर आणि 234 पोलीस कर्मचाऱ्यांचा समावेश आहे.