वृत्तसंस्था / बडोदा
भारतीय क्रिकेट क्षेत्रातील प्रख्यात क्रिकेट गुणलेखक दिनार गुप्ते यांचे वयाच्या 76 व्या वर्षी कोरोनामुळे मृत्यू झाल्याची माहिती सौराष्ट्र क्रिकेट संघटनेच्या प्रवक्त्याने दिली. दिनार गुप्ते हे भारतीय क्रिकेट क्षेत्रातील प्रख्यात गुणलेखक म्हणून ओळखले जात असत. त्यांचे बडोद्यामध्ये वास्तव्य होते. तब्बल 15 वर्षे ते भारतीय क्रिकेट मंडळाचे अधिकृत क्रिकेट गुणलेखक होते. 1999 साली झालेल्या आयसीसीच्या विश्वचषक क्रिकेट स्पर्धेवेळी त्यांनी भारतीय संघाबरोबर अधिकृत गुणलेखक म्हणून यशस्वी कामगिरी केली होती. सौराष्ट्र क्रिकेट संघटनेतर्फे तसेच क्रिकेट क्षेत्रातील अनेक मान्यवरांनी दिनार गुप्ते यांना श्रद्धांजली वाहिली आहे.