प्रतिनिधी / पणजी
विंडो बॉय वुड ऑल्सो लाईक टू हेव अ सबमरीन या चित्रपटात विलक्षण ठिकाणी व परिस्थितीमध्यें एकमेकांशी संबंध नसलेल्या विचित्र गोष्टींबद्दलचे सौंदर्य आणि रहस्यमय चित्रण केले आहे. एखाद्या व्यक्तीला दुसऱया ठिकाणी राहण्यामागील कल्पनारम्यतेबद्दल आहे. आपल्याला एखादा दरवाजा सापडल्यास आपण तो दरवाजा उघडतो आणि जातो आणि कधीकधी आपल्याला जाणवते की दुसऱया बाजूला काहीच नाही. आपल्या भोवतालच्या गोष्टींशिवाय दुसरे काहीच नाही हे समजून घेण्याच्या निराशाजनक आणि मुक्त करणाऱया भावनेबद्दल या चित्रपटात सांगण्यात आले आहे. माझ्यासाठी जग हे खुल्या जागेसारखे म्हणजेच कॉरिडोअरसारखे आहे. ज्याठिकाणी जायला आवडेल असे उद्गार विंडो बॉय वुड ऑल्सो लाईक टू हेव अ सबमरीन या चित्रपटाचे दिग्दर्शक आलेक्स पिपेरानो यांनी 51व्या आंचिममध्ये आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत बोलताना काढले.
संपूर्ण जग या चित्रपटाचा एक भाग म्हणून दाखविण्यात आला आहे. उरूग्वे, अर्जेटिना विचित्र पद्धतीने दाखविण्यात आले आहेत. चित्रपटाचे शीर्षक हे एक खुले द्वार असून जे चित्रपटाचा अनुभव घेण्यासाठी आपल्याला आमंत्रित करते. आपल्याला चित्रपटांच्या पात्रांचा न्याय करण्यास सक्षम करते. सदर चित्रपट भावनांशी जोडण्यात आला आहे. एखादा स्वतःच्या चित्रपटात परदेशी होणे हा त्यांच्यासाठी एक चांगला अनुभव आहे. मी सदैव विविध प्रकारच्या कल्पना आणि प्रतिमा गोळा करत असतो आणि ज्याक्षणी मी त्यांना समजू शकत नाही त्यावेळेस मी प्रेक्षक म्हणून या क्षणाचा खरोखर आनंद घेतो असे मत पिपेरानो यांनी यावेळी व्यक्त केले.
दोन वर्षांच्या कालावधीत चार वेगवेगळय़ा देशांमध्ये सदर चित्रपटांचे चित्रण करण्यात आले आहे जे एक आव्हान होते. आता या चित्रपटाचा प्रीमीयर आंचिममध्ये करण्यात आला आहे जो समाधानकारक आहे. याची निवड झाली ती खरोखर मोठय़ा यशासारखे वाटते असे चित्रपटाचे साहाय्यक निर्माता आर्केन रॉड्रीग्ज यांनी यावेळी सांगितले.