प्रतिनिधी /पणजी
वर्षपद्धतीप्रमाणे माडेल-चोडण येथील श्री देवकीकृष्ण भूमिका मल्लिनाथ देवस्थानच्या प्रांगणात गुरुवार 31 मार्च रोजी रात्री 10 वाजता विद्याधर गोखले लिखित व राजेंद्र नरसिंह फडते दिग्दर्शित ‘जय जय गौरीशंकर’ संगीत नाटक होईल. संगीत दिग्दर्शन पांडुरंग गोवेकर यांचे असून तबलासाथ विशांत पिळगावकर यांची आहे, तर पार्श्वसंगीत विनय बोरकर यांची आहे.
यात राजेंद्र नरसिंह फडते, चैताली रा. पार्सेकर, प्राजक्ता पडते, नारायण गावस, ऋतुजा फडते, जितेंद्र पडते, हरीश चोडणकर, मिलिंद कुलकर्णी, श्रीजीत फडते, हर्ष फडते यांच्या भूमिका आहेत.
आनंद कुंडईकर, प्रसाद कुंडईकर यांनी व्यवस्थापनाची जबाबदारी सांभाळली असून बहुसंख्य नाटय़रसिकांनी नाटय़प्रयोगास उपस्थिती दर्शवावी, असे आवाहन श्री देवकीकृष्ण भूमिका मल्लिनाथ देवस्थान, माडेल-चोडणतर्फे करण्यात आले आहे.