6 ऑक्टोबरला प्रदर्शित होणार चित्रपट
माधुरी दीक्षित वयाच्या 55 व्या वर्षी देखील चित्रपट अन् वेबसीरिजमध्ये सक्रीय आहे. तिची वेबसीरिज ‘द फेम गेम’ नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झाली होती. बॉलिवूडची धक धक गर्ल माधुरी आता ओटीटी प्लॅटफॉर्मवर पुन्हा अवतरणार आहे. अमेझॉन प्राइम व्हिडिओवर माधुरीचा आगामी चित्रपट ‘मजा मा’ प्रदर्शित होणार आहे.
अमेझॉन प्राइमने ‘मजा मा’ चित्रपटातील माधुरीचा फर्स्ट लुक शेअर करत प्रदर्शनाची तारीख घोषित केली आहे. या पोस्टरमध्ये माधुरी अत्यंत सुंदर दिसून येत आहे. माधुरीचा हा चित्रपट 6 ऑक्टोबर रोजी अमेझॉन प्राइमवर झळकणार आहे. ‘डान्सिंग डीवा परतली आहे, आता आम्ही ‘मजा मा’ फील करत आहोत’ असे निर्मात्यांनी कॅप्शनमध्ये नमूद केले आहे.
या चित्रपटातील भूमिका माधुरी दीक्षितच्या कारकीर्दीतील सर्वात अनोखी ठरणार असल्याचे बोलले जात आहे. या चित्रपटात माधुरी समलैंगिक महिलेची भूमिका साकारत आहे. याचबरोबर माधुरी या चित्रपटात पहिल्यांदाच अभिनेता गजराज रावसोबत दिसून येणार आहे. या चित्रपटात ऋत्विक भौमिक, बरखा सिंह, सृष्टी श्रीवास्तव, रजित कपूर, शीबा चड्ढा, सिमोन सिंह, निनाद कामत यासारखे कलाकार आहेत. या चित्रपटाचे दिग्दर्शन आनंद तिवारी यांनी केले असून लियो मीडिया कलेक्टिव्ह आणि अमृतपाल सिंह बिंद्रा यांच्याकडून याची निर्मिती करण्यात आली आहे.