प्रतिनिधी/ वडूज/मायणी
मायणी (ता. खटाव) येथील सुपूत्र डॉ. नानासो थोरात जागतिक पातळीवरील ऑक्सफर्ड विद्यापीठात ख्यातनाम वैज्ञानिक आहेत.
दोनच दिवसापूर्वी युरोपियन कमिशनच्या प्रेसिडेंटनी या वर्षीच्या युरोपीयन मोस्ट प्रॉमिसिंग इनोव्हेशन ऍन्ड इनव्हेंटर प्राईज 2020 ची घोषणा केली. युरोप मधील 28 देशांतील 500 पेक्षा अधिक विद्यापीठे, 300 पेक्षा अधिक कंपन्या आणि 35000 पेक्षा अधिक शास्त्रज्ञ यांना मागे सारून डॉ. नानासो थोरातने आणि त्याच्या टीमने सर्वश्रेष्ठ ग्रन्ड प्रिक्स प्राईझ मिळवला. कॅन्सर वरच्या संशोधनात केलेल्या उल्लेखणीय कामगिरीबद्दल त्याला आणि त्याच्या टीमला हे अवॉर्ड दिले. 2015 सालापासून युरोपियन कमिशन हे अवॉर्ड देते, हा अवॉर्ड मिळवणारा डॉ. नानासो थोरात हा पहिला भारतीय आहे. ऑक्सफर्ड सारख्या जगातील सर्वश्रेस्ट विद्यापीठात शास्त्रज्ञ असणारा, 50 पेक्षा अधिक संशोधन पेपर, 5 पुस्तके, 3 आंतरराष्ट्रीय पेटंट/इंव्हेशन्स, 100 पेक्षा अधिक देशातील शास्त्रज्ञ याला नावाने ओळखतात, गुगलवर याचे नाव असणारा, असा हा अवलिया माणूस. मायणी गावातील एक तरुण शास्त्रज्ञ ज्याला 100 पेक्षा अधिक देशातील शास्त्रज्ञ याला नावाने ओळखतात.ही मायणीसह खटाव तालुक्यासाठी अत्यंत अभिमानाची बाब आहे. या यशाबद्दल डॉ. थोरात यांच्यावर विविध समाजमाध्यमातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.