लॉकडाऊनमुळे मागणीवर झाला परिणाम : प्रवासी वाहनांसह अन्य प्रकारच्या वाहन विक्रीचा समावेश
वृत्तसंस्था / नवी दिल्ली
वाहन कंपन्यांनी मे 2021 मधील गाडय़ांच्या विक्रीचे आकडे सादर केले आहेत. कोविड महामारीच्या दुसऱया लाटेमुळे जास्तीत जास्त कंपन्यांचे वाहन विक्रीचे आकडे निराशाजनक राहिले आहेत. देशातील सर्वात मोठी कार निर्मिती पंपनी मारुती सुझुकी इंडिया लिमिटेडला महिन्याच्या आधारे पाहता 71 टक्क्यांचे नुकसान झाले आहे. तसेच अन्य कंपन्यांची विक्रीची आकडेवारी पुढीलप्रमाणे.
मारुती सुझुकीची वाहन विक्री
कंपनीने मागच्या महिन्यात एकूण 46,555 वाहनांची विक्री केली आहे. तसेच एप्रिलमध्ये त्यांनी 1,59,691 वाहन विक्री केली होती. म्हणजे महिन्याच्या आधारे 71 टक्क्यांचे नुकसान झाले आहे. वर्षाच्या आधारे पाहिल्यास कंपनीने तेजी मिळवली आहे. मे 2020 मध्ये 18,539 गाडय़ा विकल्या होत्या. मारुतीच्या प्रवासी वाहनांची विक्री मे मध्ये 76 टक्क्यांनी घसरली आहे.
महिंद्रा आणि महिंद्राची स्थिती
मे महिन्यात लॉकडाऊनमुळे पुरवठा साखळी प्रभावीत होताना दिसते आहे. याचा परिणाम हा कंपनीच्या वाहन विक्रीवर राहिला आहे. मे मध्ये महिंद्रा ऍण्ड महिंद्राने एकूण 17,442 गाडय़ा विकल्या आहेत. महिन्याच्या आधारे त्यांना 52 टक्के नुकसान झाले आहे. एप्रिलमध्ये कंपनीने एकूण 36,437 वाहनांची विक्री केली होती. प्रवासी वाहनांच्या सेगमेंटमध्ये कंपनीने 107 टक्क्यांची वार्षिक वाढ नोंदवत 8,004 वाहने विकली आहेत.
बजाज ऑटोला मिळाली 114 टक्क्यांची वाढ
बजाज ऑटोने मे महिन्यात 114 टक्क्यांची वाढ प्राप्त करण्यासोबत 2,71,862 वाहनांची विक्री केली आहे. मागच्या वर्षात मे महिन्यात कंपनीने 1,27,128 इतक्या गाडय़ा विकल्या आहेत. देशांतर्गत विक्रीमध्ये त्यांनी 52 टक्क्यांची तेजी प्राप्त करत 60,830 वाहनांची विक्री केली.
अन्य कंपन्या
अन्य वाहन कंपन्यांमध्ये टाटा मोर्ट्सने मे महिन्यात देशातील बाजारात 24,552 वाहने विकली आहेत. जो आकडा महिन्याच्या आधारे 38 टक्क्यांनी कमी राहिला आहे. अशोक लेलँडची मे महिन्यात एकूण विक्री ही 3,199 युनिटवर राहिली. महिन्याच्या आधारे कंपनीला नुकसान झाले आहे. एप्रिलमध्ये त्यांनी 7,961 वाहनांची विक्री केली होती.