नवी दिल्ली
मोटार विक्री क्षेत्रात आघाडीवरच्या मारुती सुझुकीने करुर वैश्य बँकेसोबत भागीदारी केली आहे. या मार्फत कंपनी ग्राहकांना आकर्षक वित्त योजनेअंतर्गत कार खरेदी करण्यासाठी संधी उपलब्ध करणार आहे. इको कार वगळता इतर मारुतीच्या कार्सवर भागीदारीतून करूर वैश्य बँकेकडून अर्थपुरवठा होणार आहे.