सध्या प्रायोगिक पातळीवर योजनेचा प्रारंभ : लवकरच देशभर राबवणार
वृत्तसंस्था / नवी दिल्ली
देशातील सर्वात मोठी कार निर्मिती क्षेत्रातील दिग्गज कंपनी मारुती सुझुकी इंडियाने आपल्या वाहन लिज सबस्क्रिप्शन योजनेस प्रारंभ करणार असल्याची घोषणा नुकतीच केली आहे. कंपनीने सदरची योजना ही सध्या दिल्ली, एनसीआर तसेच बेंगळूर येथे सुरु केली आहे.
कंपनी आपली ही योजना येत्या देन ते तीन वर्षात देशातील जवळपास 60 शहरांमध्ये विस्तारीत करण्यावर भर देणार आहे. मारुतीने यांच्या व्यतिरिक्त ओरिक्स कॉर्पोरेशन, जपानच्या धर्तीवर ओरिक्स ऑटो इन्फ्रास्ट्रक्चर सर्व्हिसेज इंडियासोबत तडजोड केल्याची माहिती आहे.
कंपनीच्या नव्या योजनेंतर्गत एरीनासह नवीन स्विफ्ट, डिझायर, विटारा, ब्रीझा आणि इर्टिगासोबत नेक्सा, नवी बोलेरो, सियाज आणि एक्सएल 6 आदी कार्स निवडण्याची संधी ग्राहकांना उपलब्ध होणार असल्याचे कंपनीने स्पष्ट केले आहे.
ग्राहकांच्या सुरक्षेला प्राधान्य
नवीन कार्यक्रमाअंतर्गत मारुती सुझुकी ग्राहकांसाठी व्यक्तिगत सुविधांवर देणार असल्याचे कंपनीचे कार्यकारी संचालक शशांग श्रीवास्तव यांनी सांगितले आहे. काय आहे योजना
नवीन योजनेंतर्गत ग्राहकांना मालकी हक्क न घेता कंपनीची नवी गाडी घेता येणार असून त्याकरीता मासिक शुल्क भरावे लागणार आहे. सदरच्या शुल्कामध्ये देखभाल, विमा, रस्ते वाहन सुरक्षासह अन्य सोयी उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. 12 ते 48 महिन्याकरीता ग्राहकाला प्रत्येक महिन्याला 14 हजार 463 रुपयांचा हप्ता भरावा लागणार आहे.