प्रतिनिधी / कागल :
कागल येथील महाविदयालयीन तरुणीचा तिच्या मावसभावानेच भररस्त्यात विनयभंग केला. याप्रकरणी संबंधीत तरुणीने मावस भावाविरोधात पोलिसात फिर्याद दिली आहे. ही घटना काल, गुरुवारी सकाळच्या सुमारास पेट्रोलपंप नजीकच्या पर्यायी रस्त्यावर घडली. याप्रकरणी कोल्हापूरच्या निर्भया पथकाने संबंधित तरूणावर कारवाई करून कागल पोलीस ठाण्यात आज, शुक्रवारी त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संबंधित सुरज पाटील असे या गुन्हा दाखल करण्यात आलेल्या तरूणाचे नाव आहे.
दरम्यान, करवीरच्या निर्भया पथकाच्या प्रमुख महिला पोलीस उपनिरीक्षक मनीषा नारायणकर, सहायक फौजदार डावाळी, पोलीस कान्स्टेबल संतोष पाटील महाविद्यालय परिसरामध्ये पेट्रोलिंग करत होते. यावेळी पेट्रोलपंप नजीकच्या पर्यायी रस्त्यावर एका महाविद्यालयीन तरूणीचा विनयभंग झाल्याची माहिती मिळाली. ही माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. तर, संबंधित सुरज पाटील याच्यावर पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक मनिषा नारायणकर करीत आहेत.