गुजरात उच्च न्यायालयाचा महत्त्वाचा निर्णय
वृत्तसंस्था / अहमदाबाद
गुजरातमध्ये मास्क न वापरणाऱया लोकांना कोविड सेंटरमध्ये 5-6 तास सेवा करावी लागणार आहे. या सेवेचा कालावधी 5 ते 15 दिवसांपर्यंत असू शकतो. मास्क न वापरणाऱया व्यक्तीचे वय आणि वैद्यकीय पार्श्वभूमी पाहून हा कालावधी ठरविण्यात येणार आहे. गुजरातमध्ये कोरोना संक्रमणाच्या दुसऱया लाटेदरम्यानही अनेक लोक मास्क वापरत नसल्याचे दिसून आले आहे. अशा लोकांना कोविड केंद्रात सेवा करविण्याच्या अर्जावर उच्च न्यायालयाने बुधवारी निर्णय देत सरकारला अधिसूचना प्रसिद्ध करण्यास सांगितले आहे. मुख्य न्यायाधीश विक्रम नाथ यांच्या खंडपीठाने याप्रकरणी सुनावणी केली आहे. मास्क न वापरणाऱया लोकांकडून दंड वसूल करणे पुरेसे नाही. मास्क नसलेल्या लोकांकडून सेवा करविण्यासाठी सरकारने एखाद्या संस्थेला जबाबदारी सोपवावी. मास्कचा वापर सर्वांसाठी आवश्यक असल्याचे खंडपीठाने म्हटले आहे.