क्रीडा प्रतिनिधी /बेळगाव
कोलंबो, श्रीलंका येथे निमंत्रितांच्या मास्टर्स जलतरण स्पर्धेत बेळगावच्या ज्योती होसट्टी उर्फ कोरी यांनी 4 सुवर्णपदकासह भारताला घवघवीत यश मिळवून दिले.
तुरस्टन कॉलेज जलतरण तलाव कोलंबो येथे झालेल्या निमंत्रितांच्या मास्टर्स आंतरराष्ट्रीय जलतरण स्पर्धेत भारताचे प्रतिनिधीत्व करताना बेळगावच्या आरोग्य खात्यात कार्यरत असलेल्या ज्योती होसट्टी (कोरी) यांनी 200 मी. फ्रीस्टाईल प्रकारात सुवर्ण, 25 मी. बॅकस्ट्रोक, 50 मी. बॅकस्ट्रोक, 200 मी. बॅकस्ट्रोक या तिन्ही प्रकारात सुवर्ण, 50ƒ200 मी. फ्रीस्टाईल रिले व 50ƒ200 मी. मिक्स रिलेमध्ये कांस्यपदके पटकाविली. आंतरराष्ट्रीय जलतरण स्पर्धेमध्ये सुवर्णपदक व कांस्यपदक मिळविणाऱया ज्योती होसट्टी (कोरवी) या बेळगावच्या पहिल्या महिला आहेत. त्यांना जलतरण प्रशिक्षक गोवर्धन काकतकर यांचे मार्गदर्शन लाभत
आहे.