युक्रेनच्या अध्यक्षांकडून जखमी सैनिकांची विचारपूस : शूर सैनिकांना दिले पुरस्कार
रशियासोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान युक्रेनचे अध्यक्ष वोल्दोमिर जेलेंसकी यांनी शनिवारी अचानकपणे कीव्ह येथील एका रुग्णालयाचा दौरा केला आहे. या रुग्णालयात युक्रेनचे जखमी सैनिक उपचार घेत होते. जेलेंस्की यांनी सैनिकांसोबत सेल्फी घेत त्यांची विचारपूस केली तसेच त्यांच्यासोबत हास्यविनोदात सामील देखील झाले.
जेलेंस्की यांनी या सैनिकांना रुग्णालयातच पुरस्कार प्रदान केले आणि मित्रांनो लवकरच बरे व्हा असे सांगितले. युक्रेनच्या अध्यक्षांनी उत्साह वाढविणारा एक संदेश देखील दिला आणि ‘सहकाऱयांनो विजय हीच सर्वात मोठी भेट असल्याचे’ उद्गार काढले आहेत.
युक्रेनच्या अध्यक्षांनी रुग्णालयात दाखल सैनिकांची भेट घेत त्यांचे मनोबल वाढविले आहे. यादरम्यान त्यांनी सैनिकांसोबत सेल्फी देखील घेतली. तसेच 106 सैनिकांना हीरोज ऑफ युक्रेनच्या पुरस्काराने सन्मानित केले आहे. हा पुरस्कार युक्रेनमध्ये शौर्य आणि साहसासाठी देण्यात येणारा सर्वात मोठा पुरस्कार आहे.
रशियाकडून युद्ध म्हणजे हत्येचा प्रकार असून आम्ही याला कधीच विसरणार नाही तसेच यात सामील लोकांना माफही करणार नाही. आम्ही आमच्या भूमीवर अत्याचार करणाऱया सर्व लोकांना शिक्षा मिळवून देऊ असे जेलेंस्की यांनी यावेळी म्हटले आहे.