शहरातील मुख्य केंद्र, महापालिका वर्धापन दिनाचे औचित्य साधून लोकार्पण
प्रतिनिधी/ मिरज
शहरातील प्रभाग चार येथे कमानवेस परिसरात नव्याने बांधलेल्या अद्ययावत अग्निशामक केंद्राचे उद्घाटन झाले. महापालिका वर्धापन दिनाचे औचित्य साधून बुधवारी महापौर दिग्विजय सुर्यवंशी, आयुक्त नितीन कापडणीस यांच्या हस्ते तसेच प्रभागातील नगरसेवक, अधिकारी आणि महापालिका पदाधिकाऱयांच्या उपस्थितीत अग्निशामक केंद्राचा नारळ फोडण्यात आला. आता केंद्र शहरातील मुख्य अग्निशामक विभाग म्हणून काम करणार आहे, अशी माहिती स्थायी समिती सभापती निरंजन आवटी यांनी दिली.