म्हैसाळ / वार्ताहर
मिरज तालुक्यातील म्हैसाळ येथे प्राथमिक आरोग्य केंद्रात जिल्हास्तरीय पल्स पोलिओ उद्घाटन सोहळा समारंभ जिल्हा परिषद अध्यक्षा सौ प्राजक्ता ताई कोरे यांच्या शुभहस्ते करण्यात आला.
सर्व परीसरात पल्स पोलिओ लसीकरण मोहिम राबविण्यात येत असून विशेषतः वाडी वस्ती वरील एकही बालक यांपासून वंचित राहू नये याची दक्षता घ्यावी असे आवाहन सौ कोरे यांनी केले.
याप्रसंगी पंचायत समितीच्या सभापती सौ त्रिशला खवाटे ,मिरज पंचायत समितीचे उपसभापती दिलीप कुमार पाटील, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.मिलिंद पोरे ,तालुका आरोग्य अधिकारी डॉ. सावंत.प्राथमिक आरोग्य केंद्र वैद्यकीय अधिकारी नंदकुमार खंदारे ,नूतन ग्रा.प सदस्य नंदकुमार कोरे (विजयनगर),यांच्यासह गावातील ग्रामपंचायत सदस्य, आरोग्य कर्मचारी, आशा वर्कर , अंगणवाडी सेविका,, महिला उपस्थित होते.