प्रतिनिधी /कुडचडे
फळणे, मीराबाग-सावर्डे येथील तुषार तुळशीदास नाईक (वय 29) याने मंगळवारी राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची माहिती कुडचडे पोलीस स्थानकातून प्राप्त झाली. सदर प्रकार सकाळी घडल्याचा अंदाज असून पंचनामा निरीक्षक रवींद्र देसाई यांच्या मार्गदर्शनखाली उपनिरीक्षक गौतम शेटकर यांनी केला. मृतदेह शवचिकित्सेसाठी मडगावच्या हॉस्पिसियोमध्ये पाठविण्यात आला असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीप्रमाणे, मयत तुषार हा सुशिक्षित असून पदवी प्राप्त करून पुढील शिक्षण घेण्याच्या तयारीत होता. पण अचानक त्याने आत्महत्या केल्याने त्याच्या कुटुंबातील आई, बाबा, आजी व भाऊ यांच्यावर दुःखाचे सावट पसरले आहे. त्याचबरोबर मीराबाग परिसरातही हळहळ व्यक्त होत असून सदर घटनेवर मीराबागचे पंच संजय नाईक यांनी दुःख व्यक्त केले आहे.