प्रतिनिधी/ सातारा
मी प्युअर मराठा आहे, हे मला माहिती आहे. राज्यातील मराठा नेत्यांना माहिती आहे. मराठा तरुणांना माहिती आहे. मी कधीही मराठा समाजाचे भावनिक राजकारण केले नाही. मी कोणाच्या आव्हानाला भीक घालत नाही. त्या युवकांना सहकार्य करतो आहे. त्यांच्या संरक्षणासाठी हा शशिकांत शिंदे समर्थ आहे. मराठा आंदोलनावेळी मराठा नेत्यांनी विधी मंडळांच्या आमदारांची बैठक बोलावली होती त्यावेळी यादी काढली तरी मराठा समाजाचा कोणाला कळवला आहे हे समजेल, असे प्रत्युत्तर आमदार शशिकांत शिंदे यांनी दिले.
माजी आमदार नरेंद्र पाटील यांनी केलेल्या टिकेनंतर आमदार शशिकांत शिंदे हे पत्रकारांशी बोलत होते ते म्हणाले, मी मराठा आहे की नाही हे मला माहिती आहे. महाराष्ट्र राज्यातील मराठा नेत्यांना, तरुणांना माहिती की मी प्युअर मराठा आहे. मी मराठा समाजाचे भावनिक राजकारण करत नाही. मी प्रामाणिकपणाने मराठा समाजाचे काम करतो. ज्या ज्या वेळेला महाराष्ट्रात मराठा आंदोलन झाले त्या त्या वेळेला शशिकांत शिंदे प्युअर मराठा म्हणून आंदोलनात उतरले. अगदी आझाद मैदाना पर्यत. सातारा जिह्यात तोडफोड झाली त्यावेळी माझंच नाव आलं. दुसऱया कोणत्या नेत्याचं नाव आलं नाही.
त्यांनंतर कंळबोली, नवी मुंबई येथे अनेक मराठा तरुण अडचणीत आले त्यावेळेला स्वतःहुन पुढाकार घेत होतो आणि घेत राहिलेलो आहे. मराठय़ांना आधार देत राहिलो. दगडफेक करणाऱया तरुणांच्या घरी जाऊन कुठेही दमबाजी केली नाही त्यांनी बघावं. मी त्यांच्या कुटूंबाना विनंती केली त्यांना सांगितले की एका पक्षाने अशा प्रकारचा निर्णय घेतला नाही, असे सांगत आमदार शिंदे म्हणाले, ज्यांचं ते समर्थन करतात त्या पक्षाची धोरण स्पष्ट व्हावीत. देवेंद्र फडणवीस असतील की त्यांचे नेते असतील. 102 ची घटना दुरुस्ती कोणी केली त्यांनीच. कायदा त्यांनीच केला. तो पुढं नेण्याचं काम सरकार बदलल्यानंतर या सरकारने केलं. पूर्ण अभ्यास करावा. जनतेच्या भावनेशी खेळू नये, अशी टिप्पणी नरेंद्र पाटील यांच्यावर केली.
मराठा समाजाच्या आंदोलनात मी अग्रेसर
मराठा समाजाचे आंदोलन सुरू झाले. त्यावेळी कोण कुठं होते? कोणत्या पक्षाला धरून होता?, आम्ही कोणत्याही पक्षाचे जरी असलो तरी मराठा आंदोलनामध्ये पुढे होतो. अगदी विधी मंडळांच्या आमदारांची बैठक मराठा नेत्यांनी बोलवल्यानंतर जे आमदार हजर होते ती यादी काढा त्या यादीमध्ये कोण आमदार, खासदार हजर नव्हते त्याच्यावर मराठा समाजबद्दल कोणाला कळवळा आहे हे दिसून येईल. जिह्याची मराठा आंदोलनाची जबाबदारी माझ्यावर पडली तर शशिकांत शिंदे आंदोलनाला दिशा दाखवेल.