ऑनलाईन टीम / मुंबई :
कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशभरात लसीकरण मोहीम सुरू करण्यात आली आहे. लसीकरणाच्या दुसऱ्या टप्पा सुरू झल्यानंतरकोविड लसीकरण केंद्रावरील गर्दी टाळण्यासाठी आता खाजगी रुग्णालयातही लस देण्याची परवानी देण्यात आली आहे. सरकारी रुग्णालयांसोबत 29 खासगी रुग्णालयांमध्येही लसीकरण होणार असल्याची माहिती मुंबई पालिकेचे आयुक्त इक्बाल सिंग चहल यांनी दिली आहे. केंद्र सरकारचे निकष पाळणाऱ्या रुग्णालयांनाच लसीकरणाची परवानगी देण्यात आले आहे.
लसीकरणाचा दुसरा आणि महत्त्वपूर्ण टप्प्यास 1 मार्च पासून संपूर्ण देशात सुरुवात झाली. कोरोनाबाधितांची वाढती संख्या लक्षात घेऊन बहुतांश जेष्ठ नागरिक आणि 45 वर्षावरील सहव्याधी असलेल्याला नागरिकांनी पहिल्याच दिवशी मोठ्या उत्साहात लसीकरणसाठी नोंदणी राज्यभर केल्याचे चित्र आढळून आले. मोठ्या प्रमाणात नागरिकांनी लसीकरण केंद्रांवर गर्दी केली होती. मात्र लसीकरणसाठी असलेल्या पोर्टलवरील तांत्रिक अडचणीमुळे अनेक नागरिक अनेक तास केंद्रांवर तसेच बसून होते. अनेकांना लस न घेता परतावे लागले तर काहींना केंद्रावरील अभूतपूर्व गोंधळाचा सामना करावा लागला.
त्यामुळे मुंबई महानगरपालिकेने हा निर्णय घेतला आहे. संध्याकाळी आयुक्तांकडून 29 प्रायवेट हॉस्पिटलला लसीकरणासाठी मंजूरी देण्यात आली आहे. या संदर्भात मुंबई महानगरपालिकेने ट्वीट केले आहे.
- या ठिकाणी मिळणार लस :
- सुश्रूषा हॉस्पिटल आणि रिसर्च सेंटर, विक्रोळी
- के. जे. सोमैय्या हॉस्पिटल आणि रिसर्च सेंटर
- डॉ. बालाभाई नानावटी हॉस्पिटल
- वोक्हार्ट हॉस्पिटल
- सर एच. एन. रिलायन्स फाऊंडेशन हॉस्पिटल
- सैफी हॉस्पिटल
- पी.डी. हिंदुजा हॉस्पिटल
- डॉ. एल. एच. हिरानंदानी हॉस्पिटल
- कौशल्या मेडिकल फाऊंडेशन ट्रस्ट
- मसीना हॉस्पिटल
- होली फॅमिली हॉस्पिटल
- एस. एल. रहेजा हॉस्पिटल
- लिलावती हॉस्पिटल आणि वैद्यकीय संशोधन केंद्र
- गुरु नानक हॉस्पिटल
- सर्वोदय हॉस्पिटल
- करुणा हॉस्पिटल
- एच. जे. दोशी घाटकोपर हिंदू सभा हॉस्पिटल
- एआरसीसी चिल्डर्न हॉस्पिटल
- कोकीलाबेन धीरुभाई अंबानी हॉस्पिटल
- कॉनवेस्ट ॲण्ड मंजुळा एस. बदानी जैन हॉस्पिटल
- सुराणा सेठीया हॉस्पिटल
- होली स्पिरिट हॉस्पिटल
- टाटा हॉस्पिटल
- जसलोक हॉस्पिटल
- बॉम्बे हॉस्पिटल
- ब्रीच कॅण्डी हॉस्पिटल
- फोर्टिस हॉस्पिटल
- ग्लोबल हॉस्पिटल
- भाटिया जनरल हॉस्पिटल