नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरोकडून आकडेवारी प्रसिद्ध
मुंबई / प्रतिनिधी
मुंबई शहरात गेल्या वर्षभरातील गुन्हय़ांचे प्रमाण घटले आहे. नुकतीच नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरोने याबाबत आकडेवारी जाहीर केली. 2018 मध्ये मुंबईत सर्वप्रकरचे 57 हजार 73 गुन्हे दाखल झाले. 2017 च्या तुलनेत गुन्हय़ांमध्ये घट झाली. नॅशनल क्राइम रेकॉर्ड ब्युरोने 19 प्रमुख शहरांतील गुह्यांची आकडेवारी जाहीर केली आहे. सर्वाधिक 2 लाख 37 हजार 660 गुह्यांनी राजधानी दिल्ली नोंद झाली. त्यापाठोपाठ चेन्नईत 85 हजार 27 तर सुरतमध्ये 60 हजार 384 गुन्हय़ांची नोंद झाली. मात्र, मुंबईमध्ये जेष्ठ नागरिकांवर होणारे अत्याचार आणि हल्ल्यात वाढ झाली आहे.
सर्वाधिक गुह्यांची पहिली पाच शहरे
वर्षे | 2016 | 2017 | 2018 |
दिल्ली | 2 लाख 6 हजार 135 | 2 लाख 24 हजार 346 | 2 लाख 37 हजार 660 |
चेन्नई | 1 लाख 13 हजार 847 | 41 हजार 573 | 85 हजार 27 |
सुरत | 56 हजार 943 | 39 हजार 291 | 60 हजार 384 |
मुंबई | 59 हजार 72 | 58 हजार 456 | 57 हजार 73 |
कोच्ची | 54 हजार 125 | 59 हजार 612 | 54 हजार 667 |