ऑनलाईन टीम / मुंबई :
मुंबईत आज दिवसभरात 259 नवीन रुग्ण सापडले. तर पाच जणांनी आपला जीव गमावला आहे. त्यामुळे मुंबईतील कोरोनाग्रस्तांची एकूण संख्या 7 लाख 40 हजार 871 वर पोहोचली आहे. आज दिवसभरात 281 रुग्णांनी कोरोनावर मात केली असून आतापर्यंत 7,19,662 रुग्ण कोरोनामुक्त झाले असून त्यांना घरी सोडण्यात आले आहे. मुंबईत आज 34,883 कोविड चाचण्या करण्यात आल्या असून आतापर्यंत एकूण 88 लाख 89 हजार 888 कोरोना चाचण्या करण्यात आल्या.
मुंबईत आज दिवसभरात 5 रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली असून मुंबईतील मृतांचा आकडा 15 हजार 946 इतका झाला आहे. रुग्णवाढीचा सरासरी दर ही 0.4 टक्के पर्यंत खाली आला आहे. नव्या रुग्णांपेक्षा आज बरे होणारे रुग्ण अधिक असून रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढून 97 टक्के पर्यंत गेले आहे. रुग्ण दुपटीचा कालावधी वाढून 2023 दिवसांवर गेला आहे.
तर रुग्णसंख्या नियंत्रणात आल्याने सक्रिय रुग्णांचा आकडा कमी होऊन 2,825 हजारांवर आला आहे.कोरोना नियंत्रणात आल्याने मुंबईत सक्रिय कंटेंटमेंट झोन ची संख्या 0 झाली. सीलबंद इमारतींची संख्या ही कमी होऊन 24 पर्यंत खाली आली आहे. गेल्या 24 तासांत1432 अति जोखमीचे संपर्क समोर आले असून 754 जणांना कोविड काळजी केंद्र 1 मध्ये दाखल करण्यात आले आहे.
- धारावी करोनामुक्तीच्या दिशेने
धारावीत आज पुन्हा एकदा शून्य रुग्णांची नोंद झाली. तिसऱया लाटेच्या पार्श्वभूमीवर धारावीतील परिस्थिती नियंत्रणात आल्याने समाधान व्यक्त होत आहे. धारावीत सक्रिय रुग्णांची संख्या केवळ 10 असून आतापार्यंत 7 हजार पेक्षा अधिक रुग्ण बरे झाले आहेत.