ऑनलाईन टीम / मुंबई :
मुंबईतील सायन परिसरात पोलिसांच्या अँटी नार्कोटिक्स पथकाने 7 किलो हेरॉईन जप्त केले आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात त्याची किंमत जवळपास 21 कोटी रुपये आहे. याप्रकरणी एका महिला तस्करालाही अटक करण्यात आली आहे.
पोलिसांनी गुप्त माहितीच्या आधारे पाळत ठेवून या महिलेला ताब्यात घेतले आहे. या ड्रग्ज प्रकरणाची लिंक राजस्थानातील प्रतापगढ परिसराशी असल्याचे समोर आले आहे. लवकरच मुंबई पोलीस या कारवाईबाबत पत्रकार परिषद घेऊन खुलासा करणार आहेत.
दरम्यान, मुंबई पोलीस आणि अमली पदार्थ विरोधी पथकाने चालू वर्षातील पहिल्या आठ महिन्यांत 3575 आरोपींना अटक केली असून, त्यांच्याकडून तब्बल 87 कोटींचे अमली पदार्थ हस्तगत केले आहेत.