ऑनलाईन टीम / मुंबई :
मुंबई येणाऱ्या पर्यटकांसाठी एक आनंदाची गोष्ट आहे. महानगरपालिका मुख्यालयाची ऐतिहासिक वास्तू मुंबईत येणाऱ्या पर्यटकांना आतून पाहता येणार आहे. नवीन वर्षात महानगरपालिकेच्या इमारतीमध्ये शनिवार आणि रविवारी हेरीटेज वॉक करता येणार आहे.
राज्य सरकार आणि महानगरपालिकेत यासंदर्भात करार झाला आहे. यानिमित्त पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांनी महानगरपालिकेत येऊन इमारतीचा आढावा घेतला आहे. महापौर किशोरी पेडणेकर याही यावेळी उपस्थित होत्या.
महानगरपालिकेची ऐतिहासिक पुरातन वास्तू आता पर्यटकांसाठी खुली होणार आहे. बीएमसी आणि एमटीडीसी यांच्यात याबाबत करार झाला आहे. मुंबईतील पर्यटनाला चालना देण्यासाठी हा उपक्रम महत्त्वाचा ठरेल. महापालिकेची ही वास्तू अनेक ऐतिहासिक घटनांची साक्षीदार आहे. या वास्तूचे अंतर्बाह्य सौंदर्य पाहण्याची संधी पर्यटकांना मिळणार आहे.
मुंबई महापालिका मुख्यालय पुरातन वास्तू पाहणीबाबत महापालिका आणि एमटीडीसीमध्ये याआधीच सामंजस्य करार करण्यात आला होता.