ऑनलाईन टीम / मुंबई :
मुंबईचे नवे पोलीस आयुक्त हेमंत नगराळे यांनी आज राज्यपालांची भेट घेतली. नगराळेंनी मुंबईत राजभवनामध्ये भगतसिंह कोश्यारी यांची सदिच्छा भेट घेतली. पोलीस आयुक्तपदाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर हेमंत नगराळे यांची राज्यपालांसोबत ही पहिलीच भेट होती. भेटीत दोघांमध्ये नेमकी कोणत्या विषयांवर चर्चा झाली, याचा तपशील अद्याप गुलदस्त्यात आहे.
24 मार्चला भाजपचे शिष्टमंडळ राज्यपालांची भेट घेणार आहेत. त्या आधीच मुंबईच्या नव्या पोलीस आयुक्तांनी भेट घेतल्याने चर्चांना उधाण आले आहे.
दरम्यान, मुंबई पोलीस आयुक्तपदावरुन उचलबांगडी केलेले पोलीस अधिकारी परमबीर सिंग यांनी ‘लेटरबॉम्ब’ टाकत गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर गंभीर आरोप केला. अनिल देशमुख यांनी प्रत्येक महिन्याला 100 कोटी रुपयांची वसुली करण्याचे टार्गेट सचिन वाझे यांना दिलं होतं, असा खळबळजनक दावा परमबीर सिंग यांनी केला. त्यानंतर महाराष्ट्राच्या राजकारणात एकच खळबळ उडाली आहे.