मसुरे/ प्रतिनिधी-
मसुरे गावचे सुपुत्र ज्येष्ठ शिवसैनिक गजानन महादेव परब यांचे नुकतेच वयाच्या 97 व्या वर्षी मुंबई येथे वृद्धापकाळाने निधन झाले. मसुरे, मुंबई – वाकोला, सांताक्रुज परिसरामध्ये गजानन यांचे सामाजिक क्षेत्रात मोठे योगदान होते.त्यांच्या पश्चात चार मुलगे तीन मुली सुना नातवंडे जावई असा मोठा परिवार आहे मुंबई महानगरपालिका सुधार समिती अध्यक्ष सदानंद ( सदा ) परब यांचे ते वडील होत