प्रतिनिधी / बेळगाव
बेळगाव लोकसभा पोटनिवडणुकीच्या प्रचारासाठी मुख्यमंत्री बी. एस. येडियुराप्पा बेळगावात दाखल झाले असून त्यांनी मंगळवारी मुत्नाळ येथे सभा घेऊन जनतेला भाजपच्या उमेदवार मंगला अंगडी यांना विजयी करावे, असे आवाहन केले. मुख्यमंत्री दाखल झाल्यामुळे मोठी गर्दी झाली होती. जोरदार घोषणाबाजी करत कार्यकर्त्यांनी भाजपला विजयी करण्याचा निर्धार केला आहे.
भाजपच्या उमेदवार मंगला अंगडी यांच्या प्रचारासाठी मंगळवारी बैलहोंगल तालुक्मयातील मुत्नाळ येथे सभा घेण्यात आली. याचबरोबर उमेदवार मंगला अंगडी यांच्या सोबत मुख्यमंत्री येडियुराप्पा यांनी मंदिरामध्ये जाऊन पूजा करून त्यानंतर प्रचाराला जोरदार सुरुवात केली आहे. प्रचार आटोपून ते मंगळवारी रात्री ते बेळगावात दाखल झाले आहेत. यावेळी त्यांनी कार्यकर्त्यांसोबत चर्चा केली.
बुधवारी रामदुर्ग तालुक्मयातील सालहळ्ळी, सौंदत्ती तालुक्मयातील यरगट्टी, बैलहोंगल तालुक्मयातील इंचल येथे मुख्यमंत्र्यांच्या प्रचारसभा होणार आहेत. एकूणच मुख्यमंत्री बी. एस. येडियुराप्पा यांनीही बेळगावच्या पोटनिवडणुकीच्या निवडणूक प्रचारात आघाडी घेतली आहे. विविध ठिकाणी सभा तसेच सर्व आमदार व इतर लोकप्रतिनिधींना त्यांनी प्रचाराला जोर करावा, असा आदेशदेखील दिला आहे.