संकेश्वर, हुक्केरी भागात तयारीला गती : विविध विकासकामांचे होणार उद्घाटन
प्रतिनिधी /संकेश्वर
संकेश्वर व हुक्केरी येथील विविध विकासकामाचे उद्घाटन दि. 25 रोजी करण्यात येणार आहे. त्यामुळे सरकारी खात्याच्या अधिकारी व कर्मचाऱयांची लगबग सुरू झाली आहे. विविध विकासकामांचे उद्घाटन मुख्यमंत्री बसवराज बोम्माई यांच्या हस्ते होणार आहे. त्यामुळे प्रलंबित असणाऱया कामांचा लोकार्पण कार्यक्रम पार पडणार आहे. या कार्यक्रमांना नागरिकांनी मोठय़ा संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन नगरपरिषद नगराध्यक्षा सीमा हतनुरी यांनी केले आहे.
येथील आयोजित कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान राज्याचे अन्न, नागरी व वन मंत्री उमेश कत्ती भूषवणार आहेत. तर जिल्हापालकमंत्री गोविंद कारजोळ, व्ही. सोमण्णा, नगरविकास मंत्री बी. ए. बसवराज, धर्मादाय खात्याच्या मंत्री शशिकला जोल्ले, उद्योगमंत्री एन. नागराजू, सरकारचे मुख्य सचेतक महांतेश कवटगीमठ, उपसभापती विश्वनाथ मामनी, महेश कुमटोळी, निगम मंडळाचे अध्यक्ष दुर्योधन ऐहोळे, काडा विकास निगमचे अध्यक्ष पी. राजीव, खासदार अनंतकुमार हेगडे, खासदार आण्णासाहेब जोल्ले, इराण्णा कडाडी, मंगला अंगडी, आमदार सतीश जारकीहोळी, रमेश जारकीहोळी, भालचंद्र जारकीहोळी, अरुण शहापूर, गणेश हुक्केरी, विवेकराव पाटील, हणमंत निराणी, अनिल बेनके, लक्ष्मी हेब्बाळकर, अंजली निंबाळकर, महांतेश दौड्डगौडर, महांतेश कौजलगी, महोदवाप्पा यादवाड, लक्ष्मण सवदी, तळवार सोमण्णा, संकेश्वर नगपरिषद नगराध्यक्षा सीमा हतनुरी, उपनगराध्यक्ष अजित करजगी, स्थायी समिती अध्यक्ष सुनिल पर्वतराव, हासन पठाण, विश्वनाथ पाटील आदी उपस्थित राहणार आहेत.
कार्यक्रमाच्या पूर्व तयारीची पाहणी करण्यासाठी जिल्हाधिकारी एम. जी. हिरेमठ, जिल्हा पोलीस प्रमुख लक्ष्मण निबंरगी, अतिरिक्त जिल्हा पोलीस प्रमुख अमर रेड्डी, डीवायएसपी मनोजकुमार यांनी पाहणी केली आहे. तसेच कार्यक्रमात कोणताही गोंधळ निर्माण होऊ नये याची काळजी घेण्याची सूचना त्यांनी अधिकाऱयांना केली आहे.
युद्धपातळीवर काम सुरू
हुक्केरी : मुख्यमंत्री बोम्माई हे हुक्केरी शहराला भेट देणार आहेत. त्यामुळे शहर व परिसरातील प्रलंबित असणारी विकासकामे युद्धपातळीवर करण्यात येत आहेत. पूर्ण झालेल्या कामांचा शुभारंभ तर प्रलंबित असणाऱया कामांना दि. 25 रोजी चालना देण्यात येणार आहे.
हुक्केरीतील बसस्थानक, कृषी डिप्लोमा महाविद्यालय, देवराज आरस भवन तसेच हुक्केरीतील काँक्रीट रस्त्याशेजारी लावलेल्या विद्युत पथदीपाचे व डॉ. बाबू जगजीवनराम भवनाचे उद्घाटन होणार आहेत. बांधकाम विभागाने संकेश्वर-गोकाक मुख्य रस्ता तयार केला होता, त्यावर गतीरोधक तयार करण्यात आले होते. ते काढून तो मार्ग विनागतीरोधक करण्याचे काम सुरू आहे. मुख्यमंत्र्यांच्या अचानक दौऱयामुळे आता जिल्हा व तालुका प्रशासन खडबडून जागे झाले आहे. दिवसरात्र राबून प्रलंबित कामे केली जात आहेत. मुख्यमंत्री रात्री शहराला भेट देणार असल्याने नागरिकांतून नाराजी व्यक्त होत आहे.