प्रतिनिधी / बेळगाव
मुग्धा वैशंपायन यांच्या सुरेल गायनाने वर्षभरानंतर रसिक श्रोत्यांना एका सुंदर मैफलीचा आस्वाद घेता आला. शास्त्राrय आणि निमशास्त्राrय गायनाने मुग्धा यांनी ही मैफल उत्तरोत्तर रंगवत नेली. भारतरत्न भीमसेन जोशी जन्मशताब्दीनिमित्त जी. बी. जोशी मेमोरियल ट्रस्ट धारवाड, क्षमता संस्था हुबळी व स्वरमल्हार फौंडेशन बेळगाव यांच्यातर्फे आयोजित या मैफलीचे सहप्रायोजक इन्फोसीस, जीवन विमा व सांस्कृतिक संचनालय यांनी स्वीकारले आहे.
प्रारंभी जीवनविमाच्या व्यवस्थापिका वैशाली कुलकर्णी, नाटय़संपदाचे अरविंद कुलकर्णी, मुग्धा वैशंपायन, श्रीधर मांडरे यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. रोहिणी कुलकर्णी यांनी स्वागत करून कलाकारांचा परिचय करून दिला.
मुग्धा यांनी राग मुलतानीने मैफलीचा प्रारंभ केला. विलंबित तीलवाडा आणि द्रुत तीन तालातील बंदिशी त्यांनी सादर केल्या. त्यानंतर मारुबिहाग रागातील तीन तालातील बंदिश व नंतर द्रुत त्रितालात तराना पेश केला. या शिवाय ‘विष्णूमय जग वैष्णवांचा धर्म, पद्मनामा नारायणा व श्रीरंगा कमलाकांता’ हे अभंग सादर करून ‘आगा वैकुंठीच्या राया’ या भैरवीने सांगता केली. मुग्धा यांच्या दमदार आणि तितक्मयाच मधूर गायकीमुळे ही मैफल बहारदार ठरली. तबल्याची साथ श्रीधर मांडरे व संवादिनीची साथ सारंग कुलकर्णी यांनी दिली. ताणपुरा साथ पावनी ऐरसंग, टाळ साथ पुरोहित आणि राहुल मंडोळकर यांनी दिली. या मैफलीला रसिकांची लक्षणीय गर्दी होती.