बेळगाव : छत्रपती शिवाजी महाराजांच्या शिवराज्याभिषेक दिनाचे औचित्य साधून श्री सार्वजनिक गणेशोत्सव सिद्धेश्वर युवक मंडळ मुचंडी यांच्यावतीने कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी अनेक उपाययोजना हाती घेण्यात येत आहेत. यावेळी ‘माझी गल्ली माझी जबाबदारी’ या उपक्रमाचा अवलंब करून मंडळाच्यावतीने मुचंडी गावात स्टीमर मशीनचे (वाफ यंत्र) वितरण करण्यात आले.जवळपास 275 कुटुंबीयांना सदर मशीनचे वाटप करण्यात आले. यावेळी प्रशांत मोटरे, सागर घसारी, महेश कोणे, सिद्धार्थ चौगुले, सूरज चौगुले, संतोष भंगारी, बसवराज भुसारी, परशराम कोचेरी, दत्ताराम दंडकर, संजय चौगुले, डॉ. वडेयर, लिंगाप्पा कडोलकर, लक्ष्मण चौगुले आदी उपस्थित होते.
Previous Articleभारतनगर वडगाव परिसरात वृक्षारोपण
Next Article गाडीवाला आया देखो, घरसे कचरा निकालो
Tarun Bharat Portal
Amit Kulkarni a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. Specializes in sports news, local news entertainment, national news and astrology content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives.