मटका अड्डेचालक, गांजा विपेत्यांविरुद्ध कारवाई
प्रतिनिधी /बेळगाव
मटका अड्डेचालक व गांजा विपेत्यांविरुद्ध बेळगाव पोलिसांनी कारवाई सुरू केली आहे. शुक्रवारी कायदा व सुव्यवस्था विभागाचे पोलीस उपायुक्त रविंद्र गडादी यांनी मटका व गांजा विक्री व्यवसायात गुंतलेल्या दोघा जणांना एक वर्षासाठी तडिपार केले आहे. या कारवाईमुळे गुन्हेगारांचे धाबे दणाणले आहेत.
मुचंडी येथील महेश यल्लाप्पा यल्लारी (वय 40) व ज्योतीनगर, कंग्राळी खुर्द येथील विलास शंकर बाळेकुंद्री (वय 32) या दोघा जणांना एक वर्षासाठी बेळगाव जिल्हय़ातून तडिपार केल्याचा आदेश विशेष कार्यकारी दंडाधिकारीही असणारे व पोलीस उपायुक्त रविंद्र गडादी यांनी बजावला आहे.
या संबंधी पोलीस आयुक्तांनी एक पत्रक प्रसिद्धीस दिले आहे. महेश यल्लारी हा मटका खेळण्यास नागरिकांना प्रवृत्त करीत होता. त्याला तडिपार करण्यासंबंधी मारिहाळ पोलिसांनी विशेष कार्यकारी दंडाधिकाऱयांच्या न्यायालयात प्रस्ताव दाखल केला होता. याबरोबरच गांजा विक्रीसंबंधी विलास बाळेकुंद्री याला तडिपार करण्यासंबंधी एपीएमसी पोलिसांनी प्रस्ताव पाठविला होता.
स्थानिक पोलिसांनी पाठविलेल्या प्रस्तावांवर विशेष कार्यकारी दंडाधिकाऱयांच्या न्यायालयात सुनावणी झाली. अखेर शुक्रवारी महेश यल्लारी व विलास बाळेकुंद्री यांना पुढील एक वर्षासाठी बेळगाव जिल्हय़ातून तडीपार केल्यासंबंधी पोलीस उपायुक्तांनी आदेश बजावला आहे.
यापुढेही बेकायदा व्यवसायात गुंतलेल्यांविरुद्ध कारवाई होतच राहणार आहे. मटका, जुगार, गांजा विक्री प्रकरणात गुंतलेल्यांबरोबरच शहर व उपनगरांमध्ये आपल्या गुन्हेगारी कारवायांनी दहशत माजविणाऱयांवरही कारवाई करण्यात येणार आहे. नागरिकांनी अशा गुन्हेगारांविषयी जवळच्या पोलीस स्थानकाला माहिती देण्याचे आवाहनही पोलीस उपायुक्तांनी केले आहे.