प्रतिनिधी / बेळगाव
मुतगा (ता. बेळगाव) येथे बुधवारी एका मटकाबुकीला अटक केली आहे. मारिहाळ पोलिसांनी ही कारवाई केली आहे. पोलीस उपायुक्त डॉ. विक्रम आमटे यांनी एका पत्रकाद्वारे ही माहिती दिली आहे.
प्रतीक अशोक इंगळे (वय 25, रा. मुतगा) असे त्याचे नाव आहे. त्याच्या जवळून 6 हजार 400 रुपये रोख रक्कम व मटक्याच्या चिठ्ठय़ा जप्त करण्यात आल्या आहेत. या प्रकरणातील आणखी एक आरोपी चेतन वसंत चौगुले हा फरारी झाला असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत.
मारिहाळचे पोलीस निरीक्षक बी. एस. मंटूर व त्यांच्या सहकाऱयांनी ही कारवाई केली आहे. प्रतीक व चेतन या दोघा जणांविरुद्ध कर्नाटक पोलीस कायद्यांतर्गत एफआयआर दाखल करण्यात आला असून पोलीस पुढील तपास करीत आहेत.