वाळपई / प्रतिनिधी
गेल्या चार दिवसापासून सत्तरी तालुक्मयातील वेगवेगळय़ा भागांमध्ये प्रचंड प्रमाणात पाऊस पडत आहे. आज बुधवारी सकाळपासून मुसळधार पावसामुळे सत्तरी तालुक्मयातील जनजीवन विस्कळीत झाले आहे.
काही प्रमाणात अनेक गावांमध्ये वादळी वारा झाल्यामुळे नैसर्गिक पडझड झाल्याची माहिती उपलब्ध झाली आहे. यामुळे केरी सोनाळ व ठाणे भागामध्ये जाणाऱया रस्त्यावर झाडे पडल्यामुळे काही प्रमाणात वाहतुकीला व्यत्यय निर्माण झाला.
याबाबतची माहिती अशी की गेल्या चार दिवसांपासून सत्तरी तालुक्मयात मुसळधार पाऊस पडत आहेत. आजही पावसाने नित्यनियमाप्रमाणे सकाळपासून जोरदार हजेरी लावली. यामुळे जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाल्याचे चित्र पाहावयास मिळाले. आज सकाळी केरी येथील आजोबा मंदिराकडे जाणाऱया रस्त्यावर झाड पडल्यामुळे काही प्रमाणात वाहतुकीला व्यत्यय निर्माण झाला. अग्निशामक दलाच्या यंत्रणेने घटनास्थळी धाव घेऊन झाड हटवून रस्ता वाहतुकीसाठी मोकळा केला.त्याचप्रमाणे मंगळवारी रात्री उशिरा सोनाळ ठाणे मार्गावर झाडे पडल्यामुळे काही प्रमाणात वाहतुकीला व्यत्यय निर्माण झाला होता. मात्र अग्निशमन दलाच्यावतीने सदर झाडे त्वरित हटविण्यात आल्यामुळे वाहतूक सुरळीतपणे सुरू असल्याची माहिती अग्निशामक दलाच्या सुत्रांनी दिली आहे . दरम्यान रात्री उशिरापर्यंत सत्तरी तालुक्मयाच्या अनेक भागांमध्ये मुसळधार पाऊस सुरू असून यामुळे बऱयाच प्रमाणात नागरिकांची धांदल उडत असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे. मान्सूनपूर्व पावसाने सध्यातरी नागरिकांसमोर भीती निर्माण केली असून अशाप्रकारे मुसळधार पावसाने अनेक प्रकारच्या समस्या निर्माण करून दिलेले आहेत.