नवी दिल्ली
फास्टफुड व खाद्यपदार्थांमध्ये नाव कमावणाऱया मॅकडोनाल्डने आगामी काळात व्यवसाय विस्तारावर भर देण्याचे निश्चित केले आहे. याकरीता कंपनीने 100 कोटी रुपयांची गुंतवणूक करण्याचीही योजना आखली आहे. कोरोनाकाळात ऑनलाइन पद्धतीने खाद्यपदार्थ मागवणाऱयांच्या संख्येत वाढ झाली असून याचा फायदा मॅकडोनाल्डनेही बऱयापैकी उठवला आहे. याचाच भाग म्हणून व्यवसाय विस्ताराची योजना कंपनीने आखली असून 100 कोटी रुपये गुंतवण्याचे ठरवले आहे. 2022 पर्यंत कंपनीला 30 नवी आऊटलेटस् सुरू करायची आहेत.