सोनी सबवरील मनापासून पोलीस कर्तव्य निभावताना दाखवणारी मालिका ‘मॅडम सर’ अनोख्या पद्धतीने केसेस व गुह्यांचे निराकरण करणाऱया चार महिला पोलीस अधिका-यांना सादर करते. आगामी एपिसोड प्रेक्षकांना रोमांचपूर्ण ट्विस्टसह मंत्रमुग्ध करणार आहे. एसएचओ हसीना मलिक ऊर्फ गुल्की जोशी आणि सब इन्स्पेक्टर करिष्मा सिंग ऊर्फ युक्ती कपूर तात्पुरत्या कालावधीसाठी त्यांच्या संबंधित पोलीस ठाण्यांचे नेतृत्व करण्यासाठी वेगळ्या झाल्या आहेत. मालिका 7 जूनपासून नवीन एपिसोड्ससह पुनरागमन करत आहे.
करिष्मा गोमती नगर पोलीस स्टेशनचे नेतृत्व करणार आहे, कारण तेथील पूर्वीची इन्स्पेक्टर बुलबुल आजारी आहे. करिष्मा तात्पुरत्या कालावधीसाठी पोलीस स्टेशनचे नेतृत्व करण्यासाठी उत्सुक असली तरी तिला माहीत आहे की, हे सोपे नाही. या पदावर प्रामुख्याने पुरूषांचे प्रभुत्व राहिले आहे, ज्यामुळे करिष्माला या नवीन भूमिकेमध्ये अधिक आव्हानांचा सामना करावा लागणार आहे. आगामी एपिसोड्समध्ये करिष्माची खरी परीक्षा घेतली जाणार आहे. ती अव्यावसायिकता आणि राजबीर तोमर ऊर्फ कम्प्युटर सोबत प्रेमाचा सामना करण्याचा प्रयत्न
करते. करिष्मा पुरूष अधिका-यांना तिच्या आदेशाचे पालन करण्यास कसे प्रवृत्त करेल आणि तिचा ऍक्शन-पॅक दृष्टिकोन तिला प्रकाशझोतामध्ये आणण्यास सुरूवात करेल का? आगामी एपिसोड्समध्ये याचा उलगडा पाहायला मिळेल.